साठवणीतल्या आठवणी – दिवाळी

दिवाळी – अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव – किती साधी, सोपी, सुंदर संकल्पना! आपण त्याला नरकासुराच्या वधाचे रूप देऊया, रावणवधानंतर परतणाऱ्या रामाच्या अयोध्येमधील स्वागताचं रूप देऊया किंवा आणखी काही म्हणून उद्बोधूया, शेवटी ह्या सणाचे महत्त्व मूलभूत रूपाने फार साधं आहे – प्रकाशाने अंधारावर, म्हणजेच चांगल्याने वाईटावर, सत्कृत्याने दुष्कृत्यावर, ज्ञानाने अज्ञानावर, शांतीने अशांतातेवर, आशेने निराशेवर केलेली…